ओलावा


 मायेचा ओलावा मिळावा म्हणून सारी तिची धडपड होती 

वारकरी तुळस घेतात डोक्यावर जशी
तशी तिची आई तिच्या डोक्यावर होती

प्रयत्न सारे तिचे कापुरासारखे होते 
प्रेमाचा सुगंध होता त्यात
पण शेवटी जळून काहीच उरत नव्हते. 

देवघरातल्या दिव्या इतके महत्व होते आईचे तिच्यासाठी कायम.. 
दिव्याचा प्रकाश होता सर्वत्र पण -
ती मात्र दिव्याखालच्या अंधारात जगली कायम

आता वेळ येईल,
मायेचा पान्हा फुटेल…
ओंजळ भरेल
म्हणता म्हणता -
ओंजळ रिकामी राहिली 
आणि
बघता बघता वेळ निघून गेली,
अपेक्षेची वेल सुकून गेली.


Return to Main Page

~